मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओदेखील त्यांनी या सभेत दाखवला होता. यावेळी त्यांनी हे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने कारवाई करू असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या बांधकामावर हातोडा फिरवण्यात येत आहे.
हि घटना ताजी असतानाच मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंड के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही, असे मनसेने म्हटले आहे.
दरम्यान, मुंब्रा येथील डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम अविनाश जाधव यांनी दिला होता. या धमकीनंतर मनसे कार्यक्रते आक्रमक झाले आहे. या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.