सातारा : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1810 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर 34 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 98 हजार 532 झाली आहे. तर करोनाने आजअखेर जिल्ह्यातील 2 हजार 422 जणांचे बळी घेतले आहे.
या करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. तर कंसात आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या. जावळी 77 (4627), कराड 202 (15222), खंडाळा 101 (6036), खटाव 200 (8450), कोरेगाव 139 (8224), माण 90 (5681), महाबळेश्वर 69 (3258), पाटण 73 (3994), फलटण 217 (12351), सातारा 507 (22674), वाई 114 (7499) व इतर 21 (516). आजअखेर एकूण 98 हजार 532 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 12 मृत्यू आहेत. आजचे तालुकानिहाय मृत्यू पुढीलप्रमाणे आहेत. कंसात आजअखेर मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या
जावली 0 (96), कराड 4 (423), खंडाळा 0 (81), खटाव 0 (237), कोरेगाव 4 (229), माण 3 (133), महाबळेश्वर 1 (29), पाटण 1 (115), फलटण 3 (179), सातारा 12 (720), वाई 6 (180). आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2422 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.