ढाका- गेल्या काही दिवसात बलात्काराच्या विविध घटनांनी ढवळून निघालेल्या बांगलादेशात बलात्काराच्या गुन्ह्याला मृत्यूदंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे कायदामंत्री आनीसुल हक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देशाचे राष्ट्रपती याबाबतचा अध्यादेश जारी करणार आहेत. एका ३७ वर्षीय महिलेवरील बलात्काराचे फुटेज देशात वायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.
त्यानंतरच सरकारला हा निर्णय घ्यावा लागला बंगला देशात सर्वसाधारण्पणे एका वर्षात बलात्काराच्या १००० पेक्षा जास्त घटना घडतात अनेक घटनांची नोंद होत नाही असे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात बांगलादेशात सर्वत्र अशा घटनांच्या विरोधात तीव्र आले आंदोलन करण्यात आले होते त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विध्यार्थी संघटनेनेही सहभाग घेतला होता