कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कुडीत्रे गावामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
स्वप्नील आणि सुहास पाटील असे मृत पावलेल्या भावांची नावे आहेत. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील कुडीत्रे गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे सख्खे भाऊ नदीकाठावर असलेल्या शेतात पिकांना खत टाकण्याचे काम करत होते. यावेळी शेतात असलेल्या विजेच्या खांबाची तार तुटून लोंबकळत होती. याचा अंदाज न आल्याने दोघांनाही जोराचा शॉक लागला.
यापैकी एकाला सुरुवातीला तारेचा स्पर्श झाला असावा त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने धाव घेतली असावी आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला. असा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.