कुवैतच्या राजांचे निधन

दुबई – कुवैतचे राजे शेख सबाह अल अहमद अल सबाह यांचे आज वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांनी 1990 सालच्या आखाती युद्धानंतर इराकशी जवळीक कायम ठेवली होती. तसेच प्रादेशिक तंट्यांवच्या तोडग्यांबाबतही त्यांनी सकारात्मक धोरण कायम ठेवले होते. कतार आणि अन्य अरब देशांमधील वाद मिटवण्यासाठी मुत्सदेगिरीचा त्यांनी नेहमीच पाठपुरावा केला होता.

2006 मध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर इराकी सैन्याला हुसकावून लावण्यात आले होते. त्यानंतर केवळ 9 दिवसातच कुवैतचे पूर्वीचे आजारी राजे शेख सद अल अब्दुल्लाह अल सबाह यांना हटवण्याचा निर्णय कुवैतच्या संसदेने एकमताने घेतला.

त्यानंतर राजे सबाह यांनी कुवैतच्या राजघराण्याची सूत्रे हाती घेतली होती. मात्र त्यांना अंतर्गत राजकीय वादांना सामोरे जावे लागले होते. 2011 मधील अरब देशांमधील आंदोलने आणि तेलाच्या किंमतींमध्ये होणारी चढउतार यामुळे कुवैतच्या अर्थकारणाला अनुदानाद्वारे त्यांना हातभार लावाला लागला.

राजे शेख सबाह यांनी आधुनिकीकरणाचे प्रतिनिधीत्व केले होते. तसेच अन्य राजघराण्यांशी वैयक्तिक पातळीवर सलोख्याचे संबंध ठेवले. तसेच अमेरिकेबरोबर नेहमीच मैत्रीचे संबंधही त्यांनी कायम ठेवले होते.

राजेशहीतील मंत्री शेख अली जेराह अल सबाह स्थानिक सरकारी टिव्हीवर एका संक्षिप्त निवेदनाद्वारे राजे सबाह यांच्या निधनाचे वृत्त जाहीर केले. मात्र राजांच्या निधनाचे नेमके कारण त्यांनी सांगितले नाही. राजे सबाह यांचे सावत्र बंधू आणि युवराज शेख नवाफ अल अहमद अल सबाह हेच राजघराण्याचे उत्तराधिकारी असतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.