भीषण अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू

म्हसवड – म्हसवड मायणी रोडवर दुचाकी व बोलेरो गाडीच्या भीषण अपघातामध्ये दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुडलिंक दादासो जानकर आणि शशिकांत दादासो जानकर (भेंडवडे ता. खानापुर) अशी या दोघा भावांची नावे आहेत.

कुंडलिक दादासा जानकर (वय 28) आणि शशिकांत दादासो जानकर हे दोघे सख्खे भाऊ आपल्या दुचाकीवरुन म्हसवडहून मायणीच्या दिशेने निघाले होते. त्यांची दुचाकी दिवड गावच्या हद्दीत आली असता समोरुन येणाऱ्या बोलेरो या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. दरम्यान, समोरुन येणारी बोलेरी कार आणि जानकर यांची दुचाकीही भरधाव वेगात असल्याने दुचाकीचा या अपघातात अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बोलेरोच्या या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, कुंडलिक दादासो जानकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर शशिकांत जानकर घटनास्थळावरील उपस्थिातांनी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.