सातारा – सातारा येथे काल सोमवारी मरण पावलेला रुग्णाचा अहवाल पाँझिटिव्ह मिळाला असून त्याचा म्रुत्यू करोनासह ह्रदयविकाराने झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या ६३ वर्षीय पुरुष कोविड-१९ बाधित मृत रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा दुसरा नमुना पुण्यातील एन.आय.व्ही. यांच्याकडे तपासणीककरीता पाठविण्यात आला होता. रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला असून रिपोर्टनुसार मृत व्यक्ती ही पॉझिटिव्ह असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या ६३ वर्षीय कोविड-१९ बाधित रुग्णाचा मृत्यु हा कोविड-१९ सह तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचेही श्री. गडीकर यांनी कळविले आहे.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा