पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा खात्मा 

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाला मोठे यश हाती आले आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून यामध्ये पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंडचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रालमध्ये रविवारी रात्री दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक झाली असता तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदस्सिर अहमद खान उर्फ ‘मोहम्मद भाई’ याचाही समावेश होता. मोहम्मद भाईचा पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी पुलवामातील अवंतीपुरा येथील आत्मघातकी हल्ल्यात ४० सीआरपीफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैशने घेतली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)