पुणे – कात्रज राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील “नंदिनी’ वाघिणीचा गुरुवारी मृत्यू झाला. मागील तीन वर्षे नंदिनी संधिवात आणि स्नायू दुखीमुळे आजारी होती.
‘नंदिनी’ ही वाघिण पिवळा पट्टेरी बंगाली वाघ या कुळातील होती. महापालिकेच्या पेशवे उद्यानात नंदिनीचा जन्म झाला असून, पेशवे उद्यान स्थलांतरित झाल्यापासून नंदिनी कात्रज प्राणिसंग्रहालयात होती. मागील काही दिवसांपासून वाघिणीच्या पायात व्यंग निर्माण झाले होते. तिला चालतादेखील येत नव्हते. पंधरा दिवसांपासून अन्नपाणी सोडल्याने तिला सलाईन देण्यात येत होते. सामान्यपणे वाघाचे आयुर्मान 15 वर्षांचे असते. नंदिनी साडेसोळा वर्षे जगली.