अयोध्याः श्री रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे बुधवार १२ फेब्रुवारी रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. महंत सत्येंद्र दास यांची ब्रेन स्ट्रोकमुळे प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी लखनऊच्या SGPGI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारम्यान मृत्यू झाला आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. याबाबतची माहिती SGPGI रुग्णालयाने प्रसिद्ध पत्रक काढत दिली.
३ फेब्रुवारीला त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांना गंभीर अवस्थेत SGPGI रुग्णालयाच्या एचडीयू न्यूरोलॉजी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्यांची उपचारादम्यान प्राणज्योत मालावली. 6 डिसेंबर 1992 रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा ते तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते. महंत दास यांचा अयोध्येसह इतर ठिकाणी आदर केला जातो.
२० व्या वर्षी स्विकारला अध्यात्मिक जीवनाचा पर्याय
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. तेव्हा दास तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते. राम मंदिराचे सर्वाधिक काळ सेवा करणारे मुख्य पुजारी दास यांनी केवळ 20 वर्षांचे असताना आध्यात्मिक जीवनाचा पर्याय निवडला. संपूर्ण अयोध्येत आणि त्यापलीकडेही त्यांचा आदर केला जातो. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा दास यांनी केवळ नऊ महिने मुख्य धर्मगुरू म्हणून काम केले.
बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर सर्वत्र मोठा विध्वंस पाहिला मिळत होता. मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली गेली. या काळात राम मंदिर आंदोलन आणि पुढे जाण्याच्या भूमिकेवर दास ठाम होते. या सर्व बाबींवर दास नेहमीच प्रसारमाध्यमांशी संयमाने उत्तर देत असायचे. या विध्वंसानंतरही दास मुख्य पुजारी म्हणून राहिले आणि तात्पुरत्या मंडपाखाली रामलल्लाची मूर्ती बसवण्यात आली तेव्हाही त्यांनी पूजा केली.