नगर: शेवगाव-पांढरीपूल मार्गावरील पांगरल शिवारात कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे.
प्रशांत नारायण आव्हाड (वय-16 रा. पांगरल) असे मयत मुलाचे नाव आहे. याबाबत नामदेव नाना आव्हाड (वय-54, रा. पांगरल ता. जि.नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार (क्र .एम.एच.16 बी. वाय. 3956) कार मालकाविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, शेवगाव-पांढरीपूल जाणाऱ्या रस्त्यावर पांगरल परिसरात मंगळवारी (दि.5) रोजी पांगरमल येथील वळणावर परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने कारचालकाचा ताबा सुटला त्यामुळे इलेक्ट्रीक पोलला कार आदळून सायकलवर धडक बसल्याने सायकलस्वारास मृत्यू झला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पालवे करत आहे.