सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू; पळून जाण्याचा प्रयत्न करताना…

Assam Minor Gangrape Case | आसाममधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 वाजता तपास सुरू असताना पोलिस आरोपीला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जात होते. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत तलावात उडी मारली. ज्यात आरोपी तफजुल इस्लामचा मृत्यू झाला आहे. २ तासांच्या बचाव मोहिमेनंतर आरोपीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आसाम येथील नागाव जिल्ह्यातील धिंग परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात तिघांची नावे समोर येत आहे. यामध्ये तफाझुल इस्लाम (२४) या आरोपीचाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय सुरक्षा संहिता आणि POSCO कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कृत्यात सहभागी असलेल्या अन्य दोन गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
गँगरेप प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूबाबत एसपी स्वप्नील डेका म्हणाले, ‘आरोपीची चौकशी करून त्याला गुन्ह्याच्या ठिकाणी नेल्यानंतर त्याने आमच्या ताब्यातून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि तलावात उडी मारली. त्यानंतर तत्काळ एसडीआरएफला बोलवण्यात आले. शोध घेतल्यानंतर आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत एक पोलिस हवालदार जखमी झाला. याप्रकरणी आम्ही लवकरच इतर आरोपींनाही अटक करू,” असेही त्यांनी सांगितले आहे. Assam Minor Gangrape Case |
अल्पवयीन मुलगी शिकवणीवरून परतताना घडली घटना
गुरुवारी संध्याकाळी अल्पवयीन मुलगी शिकवणीवरून घरी परतत असताना धिंग परिसरात ही घटना घडली. त्यादरम्यान वाटेत तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला अल्पवयीन बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. Assam Minor Gangrape Case |
लोक रस्त्यावर उतरले
दरम्यान, गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत समाजातील विविध स्तरातील लोक शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरले. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. विद्यार्थी संघटनेने बंदची हाक दिली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून महिला व मुलींच्या सुरक्षेची खात्री देण्याची मागणी सामाजिक व राजकीय संघटनांनी केली.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची प्रतिक्रिया
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ‘अल्पवयीन मुलीसोबत घडलेली ही घटना मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. या घटनेमुळे आमच्या अंतरात्म्याला दु:ख झाले गुन्हेगारांना शासन करु. मी आसाम पोलिसांच्या डीजीपींना घटनास्थळाचा दौरा करुन अशा राक्षसांविरोधात त्वरित कारवाई कण्याचे आदेश दिले आहेत,” असं हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हंटले आहे. Assam Minor Gangrape Case |
हेही वाचा:
काँग्रेस नेते राहुल गांधी आज प्रयागराजला जाणार ; ‘या’ कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार





