सातारा – पुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा घाटात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मेघा शैलेश कारंडे (रा. सोनगाव, ता./जि. सातारा) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दि. 11 रोजी मृत मेघा या पती शैलेश यांच्यासोबत पुण्याहून साताऱ्याकडे दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी खंडाळा घाटात आली तेव्हा पाठीमागुन आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडकी इतकी गंभीर होती की, यात नेघा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.