प्लाझ्मा थेरेपी झालेल्या रुग्णाचा मृत्यू

मुंबई – राज्यात प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील 52 वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. त्या रुग्णाने आज अखेरचा श्‍वास घेतला.

ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने 52 वर्षीय रुग्णाला 20 एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाने पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती.

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्मा लीलावती रुग्णालयाला देण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्या रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्यात आला होता. आज अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.