नवी दिल्ली : देशातील करोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच चिंतेची बाब म्हणजे मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. दरम्यान, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि सुवर्ण मंदिरात हजुरी रागी (किर्तनकार) काम केलेल्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. करोना झाल्याचे निदान झाल्यानंतर या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ६२ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते. करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने तपासणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर पद्मश्री प्राप्त व्यक्तीला करोना झाल्याचे निष्पन्न झाले.