लोणंद – पतीसोबत वारंवार होत असलेल्या भांडणाला कंटाळून लोणंद येथे माहेरी आलेल्या विवाहितेला चुलत सासऱ्याने अंगावर रॉकेल टाकून जाळले. या घटनेत 95 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान पाचव्या दिवशी या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या अमोल काळे (वय 29) असे या विवाहितेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, पती सतत भांडत असल्याने ऐश्वर्या अमोल काळे मुलांसह दोन माहिन्यांपासून लोणंद येथे पोलीस वसाहतीच्यामागे आईजवळ राहत होती. तिन दिलेल्या जबाबानुसार गुरुवारी 11 जुलै सकाळी 11 वाजता तिचे चुलत सासरे तिच्या घरी आले आणि तुला पैसे देतो, असे सांगून तिला मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले व गाडीवर बसून पळून गेले. त्यानंतर ऐश्वर्याच्या आईने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती अधिक गंभीर असल्याने ऐश्वर्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र, 95 टक्के भाजल्याने बुधवारी उपचारादरम्यान ऐश्वर्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली असून ऐश्वर्या काळे हिच्या चुलत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गणेश पवार करीत आहेत.