डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू

पिंपरी – दाताची शस्त्रक्रिया करताना योग्य काळजी न घेता डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. शस्त्रक्रियेनंतर अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा जीव गेल्याची घटना प्राधिकरणातील स्टर्लिंग रुग्णालयात घडली.

धनश्री बाजीराव जाधव (वय-19, रा. नेरे ता. मुळशी) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, धनश्री जाधव हिच्या दाताची वाढ योग्य पद्धतीने न झाल्याने त्याच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला प्राधिकरण येथील स्टर्लिंग रुग्णालयात दि. 23 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली. तर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्‍टरांनी तिला अतिदक्षता विभागात ठेवले होते. यानंतरही तिची प्रकृती खालावतच गेली आणि तिचा शनिवारी मृत्यू झाला.

डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच जोपर्यंत डॉक्‍टरवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसलयचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजून काढून लेखी तक्रार देण्यास सांगीतले, लेखी तक्रार दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी उपचाराची सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याची तपासणी ससून रुग्णालयातील समितीकडून करण्यात येणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे निगडी पोलिसांनी सांगीतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.