मुजफ्फरपूर – बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार , एसकेएससीएच या रुग्णालयात 1५ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर खासगी रुग्णालयांमध्ये 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Bihar: 14 children have died in Muzaffarpur reportedly due to Acute Encephalitis Syndrome (AES). Sunil Shahi, Superintendent SKMCH, Muzaffarpur, says, “Total 38 patients were admitted, of which there are 14 casualties. Some of the admitted patients still have high fever.” pic.twitter.com/AGtVsWo2Rk
— ANI (@ANI) June 8, 2019
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एसकेएमसीएच मुजफ्फरपूरचे अधीक्षक डॉ. सुनील शाही यांनी शनिवारी रुग्णालयात इन्सेफेलाईटिस या आजाराने ग्रस्त असलेल्या 38 मुलांना दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच यातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.