पिंपरीत करोनामुळे 16 रुग्णांचा मृत्यू

Madhuvan

  • 228 रुग्णांची भर :  355 जणांना डिस्चार्ज

पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील दररोजची करोनाबाधित रुग्णसंख्या आता तीनशेपेक्षा कमी झाली आहे. शहरामध्ये आज 228 नवीन रुग्णांची भर पडली. तर 16 जणांचा आज मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्णसंख्या 85 हजार 323 इतकी झाली आहे.

शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 228 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यापैकी शहराबाहेरील 19 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 9 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 2375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 365 रुग्णांचाही समावेश आहे.

शनिवारी दिवसभरात शहरात 16 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, संत तुकारामनगर, भोसरी, चिंचवड, काळेवाडी, किवळे, निगडी येथील 9 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील शिरुर, जुन्नर, खेड, आळंदी, मुळशी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 355 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 81,107 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2708 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 932 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.