कोल्हापूर – अतितापाने बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी अरूण पाटील (वय 18, कोल्हापूर) असे मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. श्रावणीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणीचे बारावीचे पेपर सुरु होते. काही पेपर झाले होते. दरम्यान उर्वरित पेपरचा अभ्यास सुरु असताना तिला अचानक सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यनंतर रविवारी तिला घरी सोडण्यात आले. मात्र सोमवारी रात्री पुन्हा तिला त्रास सुरु झाला. अतिताप येऊन ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला.