सातारा –  जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू

सातारा –  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 11 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कालच्या तुलनेत करोनाबळींची संख्या पुन्हा जवळपास दुप्पट झाली आहे. त्यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1670 नागरिक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना धारपुडी, ता. खटाव येथील 47 वर्षीय महिला, संगमनगर, सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, ऐनाचीवाडी, ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष, केंजळ, ता. जावळी येथील 80 वर्षीय पुरुष, वावरहिरे, ता. माण येथील 51 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना पर्यंती, ता. माण 80 वर्षीय पुरुष, बोरखळ, ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, खेड, ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोडोली, ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, वडूज, ता. खटाव येथील 68 वर्षीय पुरुष, अशा एकूण 11 बाधितांचा मृत्यु झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.