मंदीत गटांगळया की मुकाबला? (भाग-२)

मंदीत गटांगळया की मुकाबला? (भाग-१)

– विशिष्ट उद्दिष्टांसाठी केलेली गुंतवणूक कधीही या वळणावर बाहेर काढू नका (When everybody is fearful, be greedy.)

– खर्चासाठी रक्कम वेगळी काढत असल्यास बचतीची रक्कम त्यात मिळवा. खर्चानंतर उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा प्रथम बचत केल्यास आणि नंतर शिल्लक राहिलेल्यांतून खर्च केल्यास थोडी काटकसर नक्कीच करावी लागेल परंतु ही वेल्थ क्रिएशनसाठी पहिली पायरी ठरेल. बचाओगे तो लगाओगे तब कमाओगे !

– प्रत्येक खर्चासाठी वेगवेगळी पाकिटं करून ठेवाकिंवा दोन वेगवेगळी खाती ठेवा एक बचत व एक खर्चासाठी. बचत खात्यास शक्यतो एटीएम कार्ड अथवा नेट बँकिंग नसावं. व त्या खात्यातील रक्कम ऑटो डेबिट सुविधेमार्फत लागलीच गुंतविली जावी.

– उत्पन्नाच्या पहिल्याच दिवशी सर्व बिलं चुकती करा. यांमुळं महिनाअखेरीस उरलेल्या पैशांच्या हिशेबानं आउटिंग अथवा वायफळ खर्च प्लॅन करता येईल. (अप्रत्यक्ष बचत).उदा. महिन्याच्या शेवटी बाहेर खाण्याचा निर्णय झाल्यास, ‘Eating Out’ या पाकिटात किती रक्कम उरली आहे यावर हॉटेल निवड अवलंबून असेल.

– आवेगी खर्चप्रवृत्ती टाळा. उदा.स्विग्गी, झोमॅटोचा अतिवापर टाळल्यास प्रत्येकवेळचे ४० रु. डिलिव्हरी चार्जेच वाचतील. महिन्याभरासाठी असे दोन-तीनदा वाचवलेले अगदी १०० रु. सुद्धा रिलायन्स म्युच्युअल फंडात लम्पसम म्हणून गुंतवता येतात जे चाळीस वर्षांत (एका १०० रु. चे)पन्नास हजार होऊ शकतात.

– जंक फूड बंद करा. आर्थिक व शारीरिक तब्येतीस हितकारक.

– व्यसनांवर खर्च होत असलेली तितकीच रक्कम त्याच वेळी बचत म्हणून कटाक्षानं बाजूला टाका. अशानं खर्च वाढल्यानं आपोआप व्यसनांवर होणारा खर्च कमीत कमी होईल व हळूहळू तो बंद करता येईल.

– शक्य असल्यास जवळच्या कामासाठी गाडीचा वापर टाळा. वेळ असल्यास चालत अथवा सार्वजनिक वाहनांचा उपयोग करा.

– इंधनाचा, विजेचा अपव्यय टाळा.

– शक्यतो घरचं अन्नसेवन करा

– शक्यतो प्रीपेड कनेक्शन्स वापरा.

– दर्जेदार उत्पादनं मिळाल्यास स्टेट्स संभाळण्यासाठी ब्रँडेड गोष्टींचा आग्रह सोडा.

– अवास्तव वार्षिक खर्च टाळा (उदा. क्लब मेम्बरशिप, इ.)

अशाप्रकारे, आपला जीवनप्रवास हा राफ्टिंग मानल्यास, आर्थिक मंदी ही उथळ पाण्यातील एक ‘रॅपिड’  असू शकते आणि त्याला घाबरून गटांगळ्या खाण्यापेक्षा आवश्यक उपाययोजना करून त्यावर मात केल्यास आपण या मार्गात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.