उस्मानाबादमध्ये वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला

उस्मानाबाद : उस्मानाबादमधील परंडा तालुक्‍यात तहसीलदारावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. भोत्रास्थित सीना नदी पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करत असताना कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या अनिलकुमार यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोत्रास्थित सीना नदी पात्रात तीन ट्रॅक्‍टर भोत्रा-परंडा मार्गावरील खडके वस्ती येथे रेती धुण्यासाठी आल्याची माहिती परांडाचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे हेळकर यांनी महसूल विभागातील कर्मचारी आकाश बाभळे, तलाठी चंद्रकांत सूर्यवंशी आणि कोतवाल आशिष ठाकूर यांच्यासह खडके यांच्या वस्तीवर ट्रॅक्‍टर ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली.

कारवाई सुरु असताना एका ट्रॅक्‍टरने पळून जाण्याच्या प्रयत्नात हेळकर यांना रेतीने भरलेल्या ट्रॉलीखाली चिरडले. या हल्ल्यात हेळकर यांच्या कबंरेवरुन ट्रॅक्‍टर गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.