पुणे – केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी विकसित केलेल्या यू-डायस प्लस ऑनलाइन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळांनी माहिती भरण्यासाठी 15 मेपर्यंतच मुदत आहे.
2020-21 या वर्षाची शाळांची माहिती “यू-डायस प्लस’ प्रणालीद्वारे संगणीकृत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शाळांचे स्कूल रिपोर्ट कार्ड जनसामान्याकरिता या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. तसेच जिल्हानिहाय शाळा, संग्रह शाळा, व्यवस्थापन निहाय शाळा, विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक व भौतिक सुविधांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
2021-22 समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्याकरिता जिल्ह्यातील शाळांची अद्ययावत माहितीची आवश्यकता आहे. शाळांमध्ये उपलब्ध सोयीसुविधा, शिक्षक, विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती मुख्याध्यापकांनी प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.