जम्मू काश्‍मीर “डीडीसी’च्या निवडणूकीत गुपकार आघाडीला 112 जागा

73 जागांवर विजय मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष

श्रीनगर/ जम्मू – जम्मू काश्‍मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा विकास परिषदांच्या निवडणूकीत एकूण 280 जागांपैकी 112 जागा मिळवून फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील 7 पक्षांची आघाडी असलेल्या गुपकार आघाडीने क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तऱ्‌ 73 जागांवर विजय मिळवून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

“पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्‍लरेशन’ ने 100 जागांवर विजय मिळवून अन्य अ12 जागांवर आघाडी मिळवली आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. बहुतेक राजकीय पक्षांमधून बाहेर पडलेल्या 47 अपक्षांनीही या निवडणूकीत विजय मिळवला आहे. आणखी 6 अपक्षांनी आघाडी मिळवल्यचे वृत्त आहे.

“जम्मू कश्‍मीर अपनी पार्टी’ने मात्र या निवडणूकीत निराशाजनक कामगिरी केली आहे. या पक्षाला केवळ 11 जागांवर विजय मिळाला असून आणखी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेसने आतपर्यंत 22 जागांवर विजय मिळवला असून आणखी 5 जागांवर आघाडी मिळवली आहे.

जम्मू काश्‍मीरमधील बहुतेक ठिकाणचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले आहेत. जम्मू विभागात भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह अन्य प्रादेशिक पक्षंच सहभाग असलेल्या गुपकार आघडीने काश्‍मीर, पीर पंचाल आणि चिनाब खोऱ्यामधील वर्चस्व राखले आहे.

मतमोजणीच्या पार्श्‍वभुमीवर प्रशासनाने पीडीपी अणि नॅशनल कॉन्फरन्सच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना ताब्यात घेतले होते. या नेत्यांना ताब्यात्‌ घेण्याचे कोणतेही कारण सांगितले गेले नाही.
“टेरर फंडिंग’ प्रकरणी “एनआयए’ने अटक केलेला पीडीपी नेता वाहीद पाराही पुलवामा-1 मधून विजयी झाला आहे. काश्‍मीरमधील तीन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी सारख्या पक्षांच्या बड्या उमेदवारांचे आव्हान असताना भाजपने प्रथमच काश्‍मीर खोऱ्यात हे यश मिळवले आहे. आठ टप्प्यातील “डीडीसी’च्या निवडणूकांना 28 नोव्हेंबर रोजी सुरूवात झली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.