DC vs LSG Nicholas Pooran became the fourth player in the world to hit 600 T20 sixes : आयपीएल २०२५ च्या चौथ्या सामन्यात निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने दिल्ली कॅपिटल्ससमोर २१० धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत आठ गडी गमावून २०९ धावा केल्या. या दरम्यान निकोलस पूरनने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा पराक्रम केला आहे. जे आजपर्यंत जगातील फक्त चार फलंदाजांनाच करता आले आहे.
निकोलसने टी-२० क्रिकेटमध्ये पूर्ण केले ६०० षटकार –
एलएसजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पूरनने येताच त्याच्या वादळी शैलीत फलंदाजी केली. या सामन्यापूर्वी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५९९ षटकार मारले होते, पण आज एक षटकार मारताच त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ६०० षटकार पूर्ण केले. ज्यामध्ये जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय आणि लीगचा देखील समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये ६०० षटकार मारणारा निकोलस पूरन हा जगातील फक्त चौथा फलंदाज आहे.
ख्रिस गेलने मारलेत सर्वाधिक षटकार –
THE NICHOLAS POORAN SHOW. 🔥pic.twitter.com/sbEk9dltBE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यांमध्ये १०५६ षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये हजाराहून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर किरॉन पोलार्ड आहे, ज्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये ६९५ सामन्यांमध्ये ९०८ षटकार मारले आहेत. या यादीत आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५३९ सामन्यांमध्ये ७३३ षटकार मारले आहेत. त्यानंतर येतो निकोलस पूरन. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ३८५ सामने खेळले आहेत आणि ६०० हून अधिक षटकार मारले आहेत.
हेही वाचा – Rahul Athiya Baby Girl : केएल राहुल IPL 2025 दरम्यान बनला ‘बापमाणूस’! पत्नी अथिया शेट्टीने दिला बाळाला जन्म
निकोलसने आक्रमक शैलीत झळकावले अर्धशतक –
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने ३० चेंडूत ७५ धावा करताना सात षटकार मारले. याचा अर्थ त्याने केवळ ६०० षटकार पूर्ण केले नाहीत तर त्याहूनही पुढे गेले आहे. २२ मार्चपासून आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू झाली आहे आणि संघ त्यांचे पहिले सामने खेळत आहेत. जर निकोलस पूरनची बॅट चालली तर तो आणखी बरेच षटकार मारताना दिसेल. सध्या तो आंद्रे रसेलला मागे टाकू शकणार नाही, परंतु त्याच्या जवळ पोहचण्याची नक्कीच संधी आहे.