प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 – बूट, गणवेश, दप्तर, वह्या, स्टेशनरी व इतर साहित्य खरेदीसाठी पुणे महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभाचे थेट हस्तांतरण होण्यासाठी डिबीटी योजना सुरू केली. या योजनेला पात्र विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी युवा सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात आला होता. याची गांभीर्याने दखल घेत महापालिकेने वेगाने कार्यवाही केली आहे.
शाळा सुरू होऊन हजारो विद्यार्थी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यापासून वंचित होते. याबाबत युवासेनेकडून पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी यांना 20 जुलैला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यावर प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत यांनी 31 जूलैपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याचे लेखी पत्र युवासेनेला दिले होते. त्यांनतर शिक्षण मंडळाने जवळपास 80 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली तर 15 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात देखील रक्कम येत्या 10 दिवसांत जमा करणार आहे. युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे 85 टक्के विषय मार्गी लागला आहे.
यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे, सहसचिव शर्मिला येवले, निकीता मारटकर, विधानसभा अधिकारी सनी गवते, गौरव पापळ, अक्षय फुलसुंदर, युवराज पारीख, अक्षय माळकर, रमेश क्षीरसागर, सागर दळवी, नितीन निगडे, अक्षय शिंदे, परेश खाडंके, मयूर कुटे, प्रतीक पाटोळे, सोनू पाटील, रोहित कुचेकर, प्रशांत पैलवान, महेश परदेशी, अनिकेत नेटके, शंतनू खुडे, सुमित जाधव, अजिंक्य मारटकर, सत्यजित कवडे, मयूर रानवडे, यश पिंगळे आदींनी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, शिक्षण विभागातील डॉ. मिनाक्षी राऊत, पोपट काळे आदी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.