पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक
पिंपरी (प्रतिनिधी) – पवना धरण 100 टक्के भरले असतानाही शहरामध्ये समान पाणीपुरवठा करण्यासाठी सोमवारपासून (दि. 25) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपुन वापरावे, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.
ज्या नागरिकांकडे योग्य क्षमतेच्या जमिनीवरील पाण्याच्या साठवण टाक्या नाहीत, त्यांनी त्वरीत त्या टाक्या बांधून घ्याव्यात. पाण्याच्या टाक्या “ओव्हरफ्लो’ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जुन्या पाण्याच्या टाक्यांचे “वॉटरप्रुफींग’ करावे. घरातील “प्लंबिंग’ साहित्याची दुरूस्ती करावी, असे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पाणीपुरवठा होणाऱ्या भागाची माहिती दिली आहे. त्यानंतर संबंधित भागात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होईल.
सोमवारी पाणीपुरवठा होणारा भाग:विकासनगर, किवळेगाव, मामुर्डी गावठाण, साईनगर, रावेत, शिंदेवस्ती परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, पिंपरीगाव, पिंपरी कॅम्प, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, दापोडी, फुगेवाडीतील काही भाग, रहाटणी परिसर, थेरगाव गावठाण, काळेवाडी, वाकड, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी गावठाण, निगडी गावठाण, संभाजीनगर, शाहूनगर भाग, ऐश्वर्यम सोसायटी परिसर, विवेकनगर, तुळजाई वस्ती, मोरे वस्ती, म्हेत्रेवस्ती, जाधववाडी, यमुनानगर, साईनाथनगर, रूपीनगर (एस-2 टाकीवरून), भोसरी गावठाण, इंद्रायणी कॉलनी, बालाजीनगर, दिघी रस्ता, गवळीनगर, बोपखेल, चऱ्होली, दिघी, डुडूळगाव, नेहरूनगर, खराळवाडी, गांधीनगर, वल्लभनगर, कासारवाडी (मध्य), अजमेरा, लालटोपीनगर.
मंगळवारी पाणीपुरवठा होणारा भाग :किवळेतील काही भाग, रावेत गावठाण, भोंडवेनगर, तुपेवस्ती परिसर, पुनावळे, वाल्हेकरवाडी गावठाण, ताथवडे गावठाण, प्रेमलोक पार्क, गिरीराज कॉलनी परिसर, पवनानगर, वेताळनगर, चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर, भाटनगर परिसर, पिंपळे गुरव गावठाण, कासारवाडीतील काही भाग, सांगवी, दापोडी गावठाण, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल व थेरगावमधील काही भाग, कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा, विनोदे वस्ती, काळाखडक झोपडपट्टी, जगताप डेअरी, कस्पटे वस्ती, विशालनगर, पिंपळेनिलख गावठाण, बालेवाडी स्टेडियम, ईएसआय रूग्णालय, आकुर्डीतील दत्तवाडी, खंडोबा माळ, चिंचवड रेल्वे स्टेशन, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी परिसर, चिखली गावठाण, बोऱ्हाडेवाडी, पवार वस्ती, कुदळवाडी, त्रिवेणीनगर, रूपीनगर, मोशी गावठाण, भोसरी गावठाणमधील काही भाग, दिघी गावठाण, दिघी मॅगझीन परिसर, वडमुखवाडी, चऱ्होलीतील काही भाग, चोवीसावाडी, गवळीमाथा, उद्यमनगर, वल्लभनगरचा काही भाग, संत तुकारामनगर, कासारवाडी रेल्वे गेटाखालील व वरील परिसर, शंकरवाडी.