दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला अटक

दुबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना क्राईम ब्रांचची कारवाई

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दाऊदचा पुतण्या रिझवान कासकर याला जेरबंद करण्यात क्राईम ब्रांचच्या पोलिसांना यश आले आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. खंडणी मागून तो देश सोडण्याच्या इराद्यात असतानाच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.

रिझवान कासकर हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासारचा मुलगा आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, इकबाल कासारला यापूर्वीच अटक करण्यात आले असून तो सध्या ठाणे येथील कारागृहात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी हवाला प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच अहमद रजा वदारिया याला अटक केली होती. याचप्रकरणी दाऊदच्या पुतण्यालाही अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात अहमद रजा हा फरार असणाऱ्या फहीम मचमचचा जवळचा सहकारी आहे. अहमद रजा याला आंतररराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. अहमद रजा हा शकील आणि फहीम यांचा निकटवर्तीय असून मुंबई, ठाणे आणि सुरतमध्ये हवाला व्यवसाय करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

अहमद रजा याची कसुन चौकशी केली असता रिझवान कासारचे नाव पुढे आहे. तो मुंबई विमानतळावरून बुधवारी रात्री देशाबाहेर जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून रिझवानला जेरबंद केले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)