दाऊद इब्राहिमवर विनोदी चित्रपट बनवणाऱ्या व्यापाऱ्याची आत्महत्या

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विनोदी चित्रपट बनवणाऱ्या नागपूरच्या एका व्यापाऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विनोद रामाणी असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. नागपूरातील नामांकित औषध कंपनीचे ते मालक होते. आपल्या राहत्या घरात त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासून पुढे आले आहे.

विनोद रामाणी हे नागपूरातील औषध विक्रीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जात. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याच्यावर विनोदी चित्रपटाची निर्मीती केली होती त्यावरून त्यांना चित्रपटातील काही सीन्स काढण्यासाठी धमक्‍यांचे फोन येत होते. याची रितसर तक्रारही त्यांनी पोलिसांमध्ये केली होती. त्यानंतर त्यांनी कॉफी विथ दाऊद नावाचा चित्रपट तयार केला. मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाले असावा किंवा या चित्रपटासाठी त्यांना धमक्‍या येत असाव्यात त्यातूनच त्यांनी आपले जीवन संपवले असावे असे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)