दाऊद टाळतोय फोनचा वापर, पण कारभार कराचीतूनच

नवी दिल्ली : भारताला हवा असणारा कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा गेले तीन वर्ष कोणताही फोन वापरण्याचे टाळत आहे. त्याचा शेवटचा फोन कॉल दिल्ली पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये रेकॉर्ड केला होता. यात त्याचे 15 मिनिटांचे संभाषण ध्वनीमुद्रित करण्यात आले होते. गुप्तचर खात्याने कराचीतील दिलेला नंबर पाळत ठेवून हे ध्वनी मुद्रण करण्यात आले. त्यानंतर दाऊदचा कॉल ट्रेस करता आला नाही.

डी कंपन्यांचा हा म्होरक्‍या द. आशियातील सर्व देशांत आपल्या गुन्हेगारी कारवाया करतो. या संभाषणात तो आपल्या एका सहकाऱ्याशी बोलत आहे. त्यात कोणत्याही गुन्हेगारीविषयक संभाषण नाही. हे संभाषण व्यक्तीगत स्वरूपाचे आहे. यावेळ तो (दाऊद) दारू प्यायलेला असावा. त्याचा आवाज काही वेळा थरथरत होता, असे एका दिल्ली पोलिसातील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर या संभाषणाबाबत सर्वोच्च पातळीवर चर्चा करण्यात आली. गुप्तचे खाते आणि रॉच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशीही त्याबाबत चर्चा केली होती,असे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र रॉकडे त्याच्या अनेक फोनचे संभाषण आहे. दिल्ली पोलिसांनी आयपीएल फिक्‍सिंगच्या अरोपांची चौकशी करताना दाऊदचे संभाषण ऐकले होते, असे दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी सांगितले.

2016च्या दाऊदच ध्वनीमुद्रणाबाबत मी काही बोलू शकणार नाही. पण, दिल्ली पोलिसांच्या विविध शाखांनी डी गॅंगचे आणि अगदी दाऊदचेही फोन टॅप केले होते, असेही नीरज कुमार यांनी स्पष्ट केले.

मुंबईत उद्योगपतींना खंडणीसाठी फोन करणारा दाऊदचा हस्तक छोटा शकीलनेही फोनचा वापर आश्‍चर्यकारकरित्या बंद केला आहे. त्यांनी फोनचा वापर करणे बंद केले असेल, पण याचा अर्थ त्याने आपला तळ कराचीहून हालावला आहे, असा नाही. दाऊद आणि त्याचे साथिदार पाकिस्तानातूनआपला कार्यभार चालवत असल्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)