Salim Dola: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची आंतरराष्ट्रीय ड्रग यंत्रणा हाताळणारा त्याचा अत्यंत जवळचा सहकारी मोहम्मद सलीम डोला याला भारतीय तपास यंत्रणांनी तुर्कीतून अटक केली आहे. दीड वर्ष तुर्कीमध्ये ‘अंडरग्राउंड’ असलेल्या डोलाची एक छोटीशी चूक त्याला महागात पडली असून, त्याला आता भारतात आणण्यात आले आहे. दीड वर्षांचा ‘वनवास’ एका चुकीने संपला – मुंबईच्या डोंगरी भागातील रहिवासी असलेला सलीम डोला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून फरार होता. अटकेच्या भीतीने तो तुर्कीतील इस्तंबूलमध्ये लपून बसला होता. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने बाहेरच्या जगाशी असलेला सर्व संपर्क तोडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपासून तो त्याच्या लपण्याच्या ठिकाणाबाहेर पडला नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या पत्त्यावर एक ‘कुरिअर’ मागवले आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. या कुरिअरच्या व्यवहारावरून भारतीय यंत्रणांना त्याच्या अचूक लोकेशनचा पत्ता लागला. इस्तंबूलमध्ये सापळा आणि अटक – (Salim Dola) Salim Dola: दाऊदचा उजवा हात सलीम डोला तुर्कीत जेरबंद; एका ‘कुरिअर’ने केला घात, असा लागला छडा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तातडीने तुर्की पोलिसांशी संपर्क साधून माहिती शेअर केली. यानंतर इस्तंबूल पोलिसांनी छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या. मंगळवारी त्याला दिल्लीत आणण्यात आले. ही कारवाई भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि इंटरपोल यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचा नमुना मानली जात आहे. (Salim Dola) तीन पासपोर्ट आणि वेगळी ओळख – तपासादरम्यान डोलाकडे तीन पासपोर्ट सापडले आहेत. यात दोन भारतीय आणि एक बल्गेरियाचा पासपोर्ट आहे. तो बल्गेरियन पासपोर्टवर ‘हमजा’ या नावाने राहत होता. हे पासपोर्ट खरे आहेत की बनावट, याचा तपास आता यंत्रणा करत आहेत. NCB कोठडीत रवानगी – मुंबईतील एका न्यायालयाने सलीम डोलाला ८ मे पर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (NCB) कोठडी सुनावली आहे. २०२३ मध्ये मुंबईत जप्त करण्यात आलेल्या ‘मेफेड्रोन’ (MD) ड्रग प्रकरणात डोला हा मुख्य सप्लायर असल्याचे समोर आले आहे.