नागपूर पोलिसांचा मुळाशी पॅटर्न: डॉनची काढली रस्त्यावरून वरात

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर शहर हे गुन्हेगारी संदर्भात कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नागपूरच्या गुन्हेगारीबाबत चर्चेला उधाण आलं आहे, पण हे उधाण कुठल्या गुन्हेगारी कृत्यामुळे नाही तर, नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकर याची रविवारी पोलिसांनी रस्त्यावरून वरात काढली आहे.

एरवी कडक इस्त्री सायचे का[दे घालून मिरवणारा, आलिशान गाड्यांमध्ये फिरणारा कुख्यात दोन रविवारी मात्र ती शर्ट आणि हाफ चड्डीवर पायी चालत न्यायालयात पोहचला आहे. गुजरातमधील एका उद्योजकाला जमिनीच्या व्यवहारात ५ कोटींचा गंडा घालून आणखी एक कोटीची खंडणी मागितल्या चा आरोप आंबेकरवर असून, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आंबेकरला शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी १ वाजता आंबेकरला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याला कोर्टात हजर केले. पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेतून आकाशवाणी चौकात आणले. तेथून त्याला वाहनातून उतरवून चक्क पायी न्यायालयात नेण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेची नागपुरात एकच चर्चा रंगली आहे.

उद्योजक जिगर पटेल मुंबईत आउटलेट सुरू करण्यासाठी जागा शोधत होते. त्यांना एक जागा आणि जागेची बनावट कागदपत्रे दाखविल्यानंतर पटेल यांनी आंबेकरशी सौदा पक्का केला. त्यानंतर पटेल यांनी जून २०१८ मध्ये ५ कोटी रुपये दिले. तेव्हापासून जागा मिळावी म्हणून पटेल प्रयत्नशील होते. ते आंबेकरला लवकरात लवकर विक्रीपत्र करून मागत होते तर वेगवेगळे कारणं सांगून आंबेकर त्यांना टाळत होता.

संशय आल्यामुळे पटेल यांनी कागदपत्रांची शहानिशा केली असता दाखविलेली जमिन आंबेकरच्या नव्हे तर भलत्याच्याच मालकीची आहे आणि या जमिनीसोबत आंबेकरचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी आंबेकरला आपली रक्कम परत मागितली. ते त्यासाठी वारंवार नागपुरात येत होते. काही दिवसांपूर्वी ते असेच नागपुरात आले. ते सेंटर पार्इंटमध्ये पटेल थांबले होते. त्याठिकाणी आंबेकर पोहचला आणि त्याने ‘मी नागपूरचा डॉन आहे. दिलेले पाच कोटी आणि ती जागा विसरून जा’ असे म्हणत पिस्तुलाच्या धाक दाखवत धमकी दिली. एवढेच नव्हे तर पुन्हा एक कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली असल्याचे पटेल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.