एटीपी चॅलेंजर टूर्नामेंट – रामकुमार रामनाथनचा पहिल्या फेरीतच पराभव

प्रजनेशचा प्री -क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

नवी दिल्ली – भारताचा डेव्हिस कप खेळाडू रामकुमार रामनाथन याला एटीपी चॅलेंजर अटलांटिक टायर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मागील आठवड्यात इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या रामकुमारचा 35 वर्षीय रूसच्या टेमुराज गाबाश्विलीने 3-6,6-4,6-1 असा पराभव केला.

रामकुमारने या स्पर्धेत स्वीडनच्या आंद्रे गोरानसन या खेळाडूसोबत दुहेरीतही सहभाग घेतला होता. मात्र, येथेही त्याला पराभवाचा सामना करावा लागला. रामकुमार आणि आंद्रे या जोडीला अमेरिकेच्या हंटर रीसे आणि नेदरलँण्डच्या सेम वेरबीक या जोडीने 6-1,6-4 असे पराभूत केले.

स्पर्धेत आता प्रजनेश गुणनेश्‍वरण याच्या रूपातच भारताचे आव्हान बाकी आहे. त्याने प्री -क्वार्टर फायनलमध्ये ( उप-उपांत्यपूर्व फेरी) प्रवेश केला आहे. त्याने कॅनडाच्या पीटर पोलांस्कीचा पराभव केला आणि आता पुढील सामन्यात त्याच्यासमोर अमेरिकेच्या जॅक सॉकचे आव्हान असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.