झाग्रेब – भारत आणि क्रोएशिया यांच्यात डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेच्या लढती होणार आहेत. लिऍण्डर पेससारख्या अत्यंत अव्वल व अनुभवी खेळाडूचा तसेच सुमित नागल व प्रज्ञेश गुणेश्वरन या गुणवान खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाचेच पारडे या लढतीत जड मानले जात आहे.
जागतिक क्रमवारीत 37 व्या स्थानावर असलेल्या मारिन चिलिचचा अपवाद वगळता क्रोएशियाकडे सर्व नवोदीत खेळाडू असल्याने भारताचे अनुभवी खेळाडू त्यांच्यापेक्षा निश्चितच वरचढ ठरणार आहेत. नागलसह प्रज्ञेशसाठी एकेरीच्या सामन्यात क्रोएशियाकडून आव्हान निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे.