श्रीनगर : दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अटक केलेले काश्मिरातील पोलिस अधिकारी दविंदरसिंग याची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण विभागाकडून (एनआयए) करण्यात येणार आहे. एनआयएने त्याचा तपास करून त्याचा दहशतवादी कारवायात कितपत सहभाग होता ते शोधावे, असे आदेश एनआयएला गृहमंत्रालयाने गुरूवारी दिले.
जम्मूमध्ये दविंदरसिंग याच्या सोबत तीन व्यक्ती प्रवास करत असताना राष्ट्रीय महामार्गावर त्यांना पकडण्यात आले. त्याच्या ह्युंदाई 10 या वाहनात सिंग पुढे बसला होता. त्याच्या मोटारीत नवीद बाबू आणि असिफ अहमद हे दोन हिज्बूल मुजाहिद्दीनचे दहशतवादी आणि रफी अहमद हा वकील यांचा समावेश होता. बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्याखाली त्याल अटक करण्यात आली.
सिदंग याच्या अटकेवरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी त्याच्या मागील कारवायाच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे पुलवामा मागचा सूत्रधार समजू शकेल असे ते म्हणाले होते. राहूल गांधी याबाबत भाष्य केले होते.
या अटकेमुळे संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याने केलेल्या आरोपावर प्रकाश झोत पडला होता. त्याने आपल्या वकीलामार्फत या कटाचा सहसुत्रधार महमंद याला दिल्लीत राहण्याची व्यवस्था करावी म्हणून दविंदरसिंग यांनी मदत करण्याची विनंती केली होती. गुरूला 2013 मध्ये फाशी देण्यात आली.
जर त्यापुर्वी दविंदरसिंगला अटक झालीअसती तर त्याचा परीणाम अफझलच्या खटल्यावर होऊ शकला असता,असे बोलले जाते. अर्थात, त्याला फाशीची शिक्षा देणारे न्या. (निवृत्त) एस एन डिंगरा यांच्या मते त्यावेळी हे प्रकरण उजेडात आले असते तरी अफझलच्या शिक्षेवर कोणताही परिणाम झाला नसता.