दाऊदच्या साथीदाराला 22 लाखांच्या पिस्तुलसह अटक

नवी दिल्ली – कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या एका साथीदाराला शनिवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. अन्वर ठाकूर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल 22 लाख रूपये किमतीचे ब्राझिलियन बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले.

उत्तरप्रदेशचा रहिवासी असणाऱ्या अन्वरने 1992 मध्ये दिल्लीतील पोलीस ठाण्यात एका खबऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. त्याप्रकरणी त्याला जन्मठेप सुनावण्यात आली.

दिल्लीतील तुरूंगात त्याला ठेवण्यात आले होते. चालू वर्षी मार्चमध्ये पॅरोल मंजूर झाल्याने तो तुरूंगाबाहेर होता. पॅरोलची मुदत संपल्यानंतर तो काही दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला पुन्हा गजाआड करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले. गॅंगस्टर बबलू श्रीवास्तव याच्याशीही त्याचे लागेबांधे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.