पाथर्डी – भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेऊन त्यांना सामाजिक कार्याची माहिती देऊन पाथर्डीला येण्याचे निमंत्रण दिले.
आ. मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड यांनी राजकारण, सामाजिक कार्यातून लोकांना मदत केली आहे. या मदतीचा संपूर्ण लेखाजोखा राज्यपाल कोशियारी यांच्यासमोर त्यांनी मांडला. करोना काळ असो, पूरपरिस्थिती अथवा दुष्काळ अशा संकटाच्या काळात दौंड सर्वसामान्यांच्या मदतीला धावून आले.
स्व. गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून दौंड यांनी राजकारणाची सुरुवात केली. हे सर्व काम राज्यपाल कोशियारी यांनी जाणून घेतल्यानंतर दौंड यांच्या कार्याचे कौतुक करून लोकांसाठी व जनतेसाठी काम करत राहा. जनता तुम्हाला कधी विसरू शकत नाही, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. श्री क्षेत्र मोहटा देवीच्या दर्शनाला यावे, असे निमंत्रण दौंड यांनी राज्यपालांना दिले आहे. नोव्हेंबर महिन्यात पाथर्डीला येण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे दौंड यांनी सांगितले.