नांदुर – गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने मुळा मुठा नदीला पूर आला आहे. मुळा मुठा नदीने आज धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी लगतच्या गावांमध्ये अनेक भागात पाणी घुसल्याने गावात दाणादाण झाली असून पूरपरिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.
सध्या मुळा मुठा नदीची पाणापातळीतील वाढ सुरूच आहे. धरणक्षेत्रासह आनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा मुठा नदी पुलाच्या वरून पाणी वाहू लागल्याने मच्छिंद्री झाल्याचे दिसून आले. मुळा मुठा नदी लगतच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मुळा मुठा नदीला मोठ्या प्रमाणात महापूराचा धोका वाढत असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे, त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुळा मुठा नदी गावांचा संपर्क तुटला आहे. मिरवडी, दहिटणे, नांदुर, खामगाव गावाला काही ठिकाणी पूरपाण्याचा वेढा बसला आहे. येथील काही ठिकाणी मंदिर अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली गेले आहे. स्मशानभूमी तसेच गावोगावी जाणारे छोटे-मोठे रस्ते पाण्याखाली गेले आहे. तसेच पाण्याचा विसर्ग जास्त आसल्यामुळे पाणी खुप वेगाने वाहत आहे. याची पाहाणी यवत सरकल कोकरे व मद्द्त सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे, शमशुदीन शेख, प्रविण बोराटे, दिपक थोरात, किसान थोरात आदी ग्रामसुरक्षादल ग्रामस्थ उपस्थित होते.
खामगाव, नांदुर, मिरवडी, दहिटणे या नदीकाठच्या गावची पाहाणी केली असून पाण्याला मोठ्या प्रमाणात वेग आहे. परंतु गावचे सरपंच, पोलिस पाटील यांच्यासह लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
– किशोर परदेशी, यवत सकेल कोकरे व गाव तलाठी
आम्ही नांदुर परिसरातील सकाळ पासुन सुरक्षितता ठेवलेली असुन ग्रमसुरक्षादल ही आमच्या बरोबर आहे काही अडचण आली सुरक्षा दल मदत करीत आहेत.
– नेहा प्रविण बोराटे, पोलिस पाटील
1997 साली असाच महापुर आला होता. त्यानंतर आताच मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले आता आम्ही सर्व गावकरी सदस्य ग्रामसेवक लक्ष देत आहोत.
– लता थोरात, नांदुर सरपंच