दौंड : दौंड तालुक्यातील सहजपुर येथील मळाईदेवी च्या मंदिरात चोरट्याने देवीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, आज सकाळी हि घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरटयांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील देवीचे दागिने, चांदीचा ६ मुखवटे आणि १ मुकूट,असे दागिने चोरले. त्यासोबतच एक तोळ्याचा सोन्याचा हार देखील चोरून नेल्याची धक्कदायक घटना घडली आहे.
आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सहजपुर गावाचे पोलिस पाटील गणेश वेताळ यांनी दिली आहे,