दौंड : अतिवृष्टीमुळे वासुंदे परिसरात पिकांचे मोठे नुकसान

वासुंदे(प्रतिनिधी) – काल (दि.२४) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील जिराईत भागातील वासुंदे, हिंगणागाडा, जिरेगाव, लाळगेवाडी आणि कुरकुंभ आदी परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

वासुंदे(प्रतिनिधी) – काल (दि.२४) रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील जिराईत भागातील वासुंदे, हिंगणागाडा,…

Posted by Digital Prabhat on Saturday, 25 July 2020

अतिवृष्टीमुळे दौंडच्या जिराईत पट्ट्यातील काही गावांमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

वासुंदे येथील जगताप तलावामधुन हाजबे-खोमणे वस्ती रोड पाण्याखाली गेला असल्यामुळे पर्यायी नविन रस्ता मुरुम टाकून तयार करुन ग्रामस्थांची दळणवळणाची सोय करण्यात आली आहे.

-निलेश भोईटे, सरपंच (वासुंदे,ग्रामपंचायत)

जास्तीच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे चारा, पिके, बाजरी, मका, कडवळ, कांदा, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक वाडीवस्तीवरील रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करणे गरजेचे आहे.

-सुधीर जांबले (शेतकरी)

Leave A Reply

Your email address will not be published.