दौड – दौंड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दौंड मधील उपजिल्हा रुग्णालय फुल झाले आहे. रुग्णालयातील महिलांच्या प्रसूती गृह कक्षामध्ये असलेल्या डिलिव्हरी बेडवर देखील कोरोना बाधित रूग्णांवर उपचार केले जात असल्याने भीषण परिस्थिती दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयात समोर आली आहे.
त्यामुळे डिलिव्हरी साठी येणाऱ्या गर्भवती महिलांना नाइलाजास्तव इतर रुग्णालयात जाण्याची वेळ या महिलांवर आली आहे. सध्या या उपजिल्हा रुग्णालयात 40 बेडची क्षमता आहे, मात्र 51 रुग्णांवर उपचार केले जात आहे. इतकी भीषण परिस्थिती दौंड निर्माण झाली आहे.