दौंड | बोरीभडक येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात 100 खाटांचे कोविड सेंटर

नांदुर (ता. दौंड) – दौंड तालुक्यात करोनाने थैमान घातलेलं आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत रूग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याने, रूग्णांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील पश्चिम पटटृयात बोरीभडक (ता. दौंड) येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ( ITI ) या ठिकाणी आयसोलेशन बेड कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

या कोविड सेंटर उभारणीचे काम सुरू झाले असुन दौंड तहसिलदार संजय पाटील, दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ, दौंड पंचायत समिती मा उपसभापती विघमान सदस्य सुशांत दरेकर,यवत मंडल अधिकारी दिपक कोकरे, गाव कामगार तलाठी किशोर परदेशी, बोरीभडक ग्रमसेवक शरद पोमणे, नांदुर ग्रमसेवक निलेश धारकर, बोरीभडक ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ म्हेत्रे. यांनी या कामाची सोमवार (ता १९) रोजी पाहणी केली.

लवकरात लवकर हे केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पंचायत समिती मा उपसभापती व विघमान सदस्य सुशांत दरेकर यांनी सांगितले. त्यातून १०० खाटा उपलब्ध केले असुन. त्यामध्ये महिला विभाग व पुरूष विभाग वेगळे केले आहे. वेगळ्या खाटांचाही समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी याठिकाणी डॉक्टर, नर्स, वार्ड बॉय आणि साफ सफाई कर्मचाऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा पोळ यांच्याकडे केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.