पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री सध्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सिंगापूर येथे त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांच्याकडे गेले आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची संभाव्य तारीख म्हणून 5 डिसेंबरचा दिवस निश्चित केला असून सगळे वैद्यकीय अहवाल व्यवस्थित आले तर त्यादिवशी लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येईल.
सध्या ते गुंतागुंतीच्या अनेक व्याधींशी लढत आहेत. त्यांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेला आहे. त्यासंदर्भातील आवश्यक चाचण्यांसाठी ते काही महिन्यांपूर्वी याठिकाणी आले होते. त्यानंतर त्यांच्या आणि त्यांना किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्य यांच्या डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या.
आता प्रत्यक्ष प्रत्यारोपणाची तारीख जवळ आल्याने डॉक्टर आणि काही चाचण्या करत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि कन्या मिसा भारती यादेखील सिंगापूरला गेल्या आहेत. त्यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादवही सिंगापूरला जातील अशी चिन्हे आहेत. बिहारमध्ये लालूप्रसाद यांचे कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा म्हणून सदिच्छा देत आहेत.