कलबुर्गी – १० मार्च रोजी केरळातील कलबुर्गी येथील रहिवाशी असलेले एक ७६ वर्षीय गृहस्थ कोरोनाने दगावले. कोरोनाने भारतापर्यंत मजल मारल्याने देशातील आरोग्य व्यवस्था खडबडून जाग्या झाल्या. यानंतर प्रकियेप्रमाणे मृत कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली. सदर वृद्धाची सेवा करणारी त्यांची ४५ वर्षीय मुलगी देखील कोरोनाग्रस्त असल्याचे चाचणीत उघड झाले. यानंतर या महिलेवर येथील इएसआयसी रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे या महिलेची कोरोना चाचणी आता निगेटिव्ह आली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय.
स्वतःचे वडील कोरोना विषाणूच्या संसर्गाने दगावल्यानंतर या महिलेने कोरोनाशी दिलेला हा लढा स्तुत्य असून कोरोनाचा योग्य उपचार व धैर्याने सामना केल्यास त्याच्यावर मात करता येते हेच यातून स्पष्ट होतंय. याबाबत बोलताना कलबुर्गीचे पोलीस आयुक्त बी सिद्धार्थ यांनी, “सदर महिलेला १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. १४ दिवसांनंतर महिलेची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर २४ तासांच्या अंतराने करण्यात आलेल्या दुसऱ्या निकालही निगेटिव्ह आल्याने महिलेस घरी सोडण्यात आले.” अशी माहिती दिली.