दत्तवाडी पोलिसांची कारवाई; चोरीच्या स्कॉर्पियोसह चार दुचाकी केल्या जप्त

पुणे – दत्तवाडी पोलिसांनी चोरीच्या एका स्कॉर्पिओसह चार दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकीवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ते सराईत वाहन चोर निघाले. ते बनावट चाव्यांचा वापर करुन वाहने चोरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

राजु उर्फ गुड्या मधुकर पवार(19, ता.मोहोळ, जि.सोलापूर) व महमद उर्फ म्हमद्या अन्वर शेख (19,रा.मोहोळ, जि.सोलापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून भारती विद्यापीठ, वाकड, राजगड आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली वाहने हस्तगत केली आहेत. या वाहनांची किंमत 10 लाख इतकी आहे. तर त्यांच्या ताब्यात सापडलेली दुचाकी ही त्यांनी तीन दिवसांपूर्वी म्हात्रे ब्रीज येथून चोरली होती. या संदर्भातही दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णु सुतार, राहुल ओलेकर, अमित सुर्वे, शरद राऊत, नवनाथ भोसले, शिवाजी क्षीरसागर, प्रमोद भोसले, सागर सुतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.