पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या तसेच ठेकेदाराचा फायदा करून देणाऱ्या राजन पाटील यांना सहशहर अभियंता या पदाचा पदभार देऊ नये, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
याबाबत साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, राजन पाटील यांची एकसदस्यीस समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशीही करण्यात आली होती. या समितीने पाटील यांना दोषी ठरवित त्यांच्याकडून 19 लाख 73 हजार रुपयांची रक्कम वसूल करण्याचे तसेच त्यांची पदावनती करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पाटील यांच्याकडे सहशहर अभियंता या पदाचा पदभार न देता अ. मा. भालकर यांच्याकडे देण्यात यावा.