पुणे {प्रभात वृत्तसेवा} – उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटची दिवशी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी भव्य पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज दाखल केला.
गोखलेनगर ते घोले रस्ता अशी पदयात्रा काढून बहिरट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अंकुश काकडे, श्रीकांत पाटील, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत आदी उपस्थितीत होते.
दरम्यान गोखलेगर येथील तुकाराम ओंबळे मैदान येथून पदयात्रेला सुरू झाली. यानंतर जनवडी, वडारवाडी, मॉडेल कॉलनी ते घोले रस्त्यावरील जवाहराला नेहरू सांस्कृतिक भवन येथील निवडणूक अधिकार्यांडे अर्ज दाखल केला.
त्यावेळी त्यांचे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जागो जागी फटाके वाजवून, हार घालून स्वागत करण्यात आले. तसेच बहिरट यांनी अर्ज दाखल करताच गोखलनगर भागातून प्रचार यात्रा सुरू केली. यात्रा गोखले नगर, जनवाडी, जनता वसाहत, रामोशी वाडी, पीएमसी कॉलनी, पाच पांडव सोसायटी, वडारवाडी, दीप बंगला चौक,महाले नगर, गोलंदाज चौक, मंजाळकर चौक आदी भागातून काढण्यात आली.