कुणासोबत डेटिंग?

मनोरंजनाच्या क्षेत्रातील नायक-नायिका चित्रपटांपेक्षा त्यांच्या रिलेशनशिप, अफेअर्स यांमुळेच अधिक चर्चेत राहतात. हल्ली सोशल मीडियामुळे तर त्यांची “कनेक्‍शन्स’ लगेचच समोर येतात. अभिनेत्री एरिका फर्नांडीसचेच उदाहरण घ्या ना !

 

View this post on Instagram

 

A day on the sets of Kasautii #prernasharma #prerna #ericafernandes #ejf #shooting #shootinglife

A post shared by ERICA JENNIFER FERNANDES (@iam_ejf) on

एरिका सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. ती सातत्याने आपल्या दिलखेचक अदांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय कलाकारांच्या यादीत एरिकाची गणना केली जाते. मॉडेलिंगपासून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या एरिकाने दक्षिणेकडील कन्नड, तामिळ आणि तेलगू भाषांमधील चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.

“कसोटी जिंदगी की 2 ‘ या मालिकेमध्ये प्रेरणा नामक व्यक्‍तिरेखा ती साकारत आहे. सध्या एरिका आपल्या बॉयफ्रेंडमुळे चांगलीच चर्चेत आहे. अर्थात, तिचा हा “लाडका’ कोण आहे ते कळू शकलेले नाही. पण अलीकडेच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन “सध्या मी कुणाला तरी डेट करत आहे’ असे म्हटले होते. आता तिने एक नवा फोटो शेअर केला आहे.


यामध्ये तिच्या हातात मोबाईल फोन आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले आहे की, ” तू माझे फेवरीट नोटिफिकेशन आहेस’. एरिकाचे नाव यापूर्वी शाहीर शेख आणि पार्थ समथानसोबत जोडले गेले आहे. आता सध्या ती कुणासोबत डेट करतेय हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.