कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचे डेटिंग

करण जोहरच्या “कॉफी विथ करण’च्या शोमध्ये गमतीमध्ये सुरू झालेला संवाद आता सिरीयस बनत चालला आहे. आम्ही बॉलीवूडच्या नवीन जोडीबद्दल बोलत आहोत. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर आता रंगायला लागले आहे. लखनौमध्ये एकत्रित प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बाहेर पडलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे व्हिडिओ ऑनलाइन बघायला मिळत आहेत. यावेळी कार्तिक साराची विशेष काळजी घेत होता. या दोघांभोवती फॅन्सचा गराडा पडल्यावर कार्तिक हाताने फॅन्सना लांब ठेवत होता. तर सारा आपल्या फोनमध्ये कार्तिकचेच शुटिंग करत होती.

“पती, पत्नी और वो’च्या रीमेकसाठी कार्तिक आर्यन लखनौमध्ये शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल गेला होता. त्यात सारा अली खान विमानतळावर उतरत होती आणि ती तिच्या बहिणीला भेटण्यासाठी लखनौला जात होती अशी अफवा पसरली होती. पण आता आमच्याकडे पुरावे आहेत की सारा लखनौमध्ये कार्तिकला भेटायल गेली होती.

कबाब-जॉईंटमधून बाहेर पडलेल्या दोघांचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. हे दोघे आतापर्यंत आपले रिलेशनशीप लपवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता दोघेही आपली स्पेशल ओळख लपवण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडत नाही आहेत.


त्यांनी आपल्यातील रिलेशन दडवून आणखी चर्चेला निमंत्रण द्यायचे नाही, असेच ठरवलेले दिसते आहे. इम्तियाझ अलीच्या “आजकल’मध्ये कार्तिक आणि सारा दिसतील. हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.